पुणे( प्रतिनिधी) – पुण्यातील समर्थ पाेलीस ठाण्याचे हद्दीतून एक ॲक्टिव्हा दुचाकी चाेरी झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. पाेलीसांनी याप्रकरणी सतर्कतेने वाहन चाेराचा शाेध घेत साेहेल समीर शेख (वय-२४,रा.नाना पेठ,पुणे) यास अटक करुन त्याच्या ताब्यातून चाेरीची दुचाकी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी दिली आहे.
पाेलिसांचे पथक वाहन चाेर पकडण्याकरिता पेट्राेलिंग करत असताना भवानी पेठेतील वाॅचमेकर चाळ येथे एक ॲक्टिव्हा विना नंबर प्लेटची संशयितरित्या जात असल्याची दिसून आली. त्यानुसार पाेलिसांनी दुचाकीस्वारास थांबवुन त्याच्याकडे चाैकशी करत गाडीची कागदपत्रे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे पाेलिसांनी आराेपी साेहेल शेख यास ताब्यात घेऊन पाेलीस ठाण्यात आणले व गाडीच्या चॅसीस व इंजिन नंबरवरुन गाडीचा क्रमांक मिळवून खातरजमा केली असता गाडी चाेरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आराेपीने नाना पेठेतील एका साेसायटीच्या पार्किंग मधुन गाडी चाेरल्याची कबुली दिली.
पाेलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम, सहापाेनि संदीप जाेरे, पाेलीस अंमलदार सुशील लाेणकर, सुभाष पिंगळे, निलेश साबळे, सुभाष माेरे, विठ्ठल चाेरमले यांचे पथकाने सदर कारवाई केली.