बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत साखळी लढतीत बुधवारी दबंग दिल्ली संघाने बेंगाल वॉरिअर्स संघावर 52-35 असा सहज मात करत आगेकूच केली. या सामन्यात दबंग दिल्लीने पहिल्या मिनिटापासूनच बेंगाल संघावर वर्चस्व राखले.
पहिल्या सत्रातच दिल्लीने आघाडी घेत आक्रमक खेळ केला. बेंगालने देखील तुल्यबळ लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना रेड व रॅपिडमध्ये गुणांची कमाई करण्यात अपयश आले. दिल्लीने 36 तर, बेंगालने 28 रेड गुणांची नोंद केली व हीच तफावत अखेरपर्यंत कायम राहिली.
दिल्लीकडून नवीन कुमारने अफलातून खेळ करताना 21 रेड गुणांसह 3 बोनस गुणांची कमाई करत एकूण 24 गुण नोंदवले.
बेंगालकडून मणिंदर सिंगने 12 रेड गुणांसह 4 बोनस गुण मिळवत एकूण 16 गुण नोंदवले. मात्र, त्याला अन्य खेळाडूंची पुरेश साथ मिळाली नाही व बेंगालला पराभवाचा सामना करावा लागला.