Tamil Thalaivas vs Bengal Warriors, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) : प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या लढतीत तमिळ थलायवाज संघाने बंगाल वॉरियर्स संघाचा 74-37 असा दणदणीत पराभव केला. तमिळ संघाचे नरेंद्र व विशाल चहल विजयाचे शिल्पकार ठरले.
THE OG TAMIL THALAIVAS!
Ending the season with records!@1xBatSporting#IdhuNammaTeam | #GiveItAllMachi | #TamilThalaivas | #ProKabaddi | #PKLSeason10 | #CHEvBEN pic.twitter.com/fEPZnP0Quh— Tamil Thalaivas (@tamilthalaivas) February 18, 2024
पहिल्या सत्रात तमिळ संघाचेच वर्चस्व राहिले. त्यांच्या नरेंद्रने तब्बल 15 गुणांची कमाई केली. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंगने 5 गुण मिळवत लढत देण्याचा प्रयत्न केला. या सत्राच्या अखेरीस तमिळ संघाने 31-18 अशी मोठी आघाडी घेतली. या सत्रात तमिळ संघाचा नरेंद्र सर्वोत्तम रेडर ठरला.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर तर तमिळ संघाचा जोर आणखीनच वाढला. त्यांना अफलातून पकडी केल्या. इतकेच नव्हे तर रेड गुणांतही झपाट्याने वाढ केली. नरेंद्रला सुरेख साथ देत तमिळ संघाच्या विशाल चहलने बाजी मारताना तब्बल 18 गुण पटकावले. या सामन्यात तमिल संघाने बंगालच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. गुणांचे अर्धशतकही या दोघांनी तमिळ संघाला पार करुन दिले. या विजयामुळे तमिळ संघाच्या बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राहिल्या.
#PKLSeason10 ( #HSvMUM Match 124 ) : हरियाणा स्टीलर्सने यू मुंबाला पराभूत करत नोंदवला 13 विजय…
बंगाल संघाच्या खेळाडूंनी प्रयत्न खूप केले मात्र, त्यांना तमिळ संघावर दडपणच टाकता आले नाही. तमिळ संघाने गुणांची सत्तरीही पार केली. हा सामना तमिळ संघाने 74 विरुद्ध 37 असा जिंकला.