Dabang Delhi K.C. vs Bengal Warriors, Pro Kabaddi League-2024 (New Delhi) :– प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाने बलाढ्य दबंग दिल्ली संघावर ४५-३८ अशी मात केली. या विजयाच्या जोरावर बंगाल संघाने उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल करत असलेल्या दिल्लीला चांगलाच दणका दिला. या सामन्यात बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग विजयाचा शिल्पकार ठरला.
They turned it around in true 𝕎𝕒𝕣𝕣𝕚𝕠𝕣𝕤 style 💥🫡
Maninder and Nitin Kumar led Bengal’s fight back, as they registered a thumping win over the hosts in Delhi💪#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #DELvBEN #DabangDelhiKC #BengalWarriors pic.twitter.com/gqu5TDMwPS
— ProKabaddi (@ProKabaddi) February 2, 2024
पहिले सत्र सुरु झाल्यापासून बंगालने आघाडी घेतली होती. या सत्रात मनिंदर सिंगने दिल्लीच्या खेळाडूंच्या सर्वोत्तम पकडी केल्या. त्याने रेड गुणांतही दिल्लीचे आव्हान मोडून काढले. मनिंदरला साथ देताना नितिन कुमारनेही १३ गुण मिळवले. दिल्लीचा कर्णधार अशु मलिक व मोहित यांनी चांगली लढत देत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर तर दिल्लीला चढाया करतानाही अपयश येत होते. या उलट बंगाल संघाने या लढतीत रेड गुणांमध्ये बाजी मारताना दिल्लीच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. गुण तालिकेत दिल्ली तिसऱ्या क्रमांवार आहे. बंगाल संघाचे यंदाच्या मोसमातील आव्हान जवळपास संपूष्टात आले आहे. मात्र, तरीही त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला त्यामुळे दिल्लीचे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याच्या शक्यतेत काहीसा आडथळा निर्माण झाला आहे.
#PKLSeason10 (#PATvBLR Match 99) : तमिळ थलायवाजचा पराभव करत जयपूर पिंक पँथर्सची प्ले-ऑफमध्ये धडक…
दिल्लीचे स्टार खेळाडू विक्रांत व मोहित यांनाही बंगालच्या खेळाडूंच्या पकडी करता आल्या नाहीत. अखेरच्या काही मिनिटांत सामना आणखी रंगेल असे वाटत होते मात्र, बंगालने दिल्ली संघाला संधीच दिली नाही व हा सामना जिंकला. या स्पर्धेत बंगालचा संघ गुण तालिकेत 10 व्या स्थानी असल्याने त्यांनी मिळवलेला हा विजय जायंट किलरच ठरला. आता दिल्लीला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवायचे असेल तर पुढील सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.