पुणे – शहरातील रेशन दुकाने आयएसओ करण्याच्या स्पर्धेमध्ये स्वतः दुकानमालकांनी पुढाकार घेतला आहे. रेशन दुकानांमध्ये लाभार्थ्यांना सोईसुविधा मिळाव्यात.
त्यासाठी स्पर्धात्मक दृष्ट्या रेशन दुकाने स्वच्छता तसेच रेकॉर्डसह सर्व गोष्टी व्यवस्थित करत आहेत. आयएसओ मिळण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, अशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
रेशन दुकानांची कामकाजाची पद्धत सर्व ठिकाणी सारखीच असणार आहे. याशिवाय सर्वाधिक महत्त्व हे दुकानातील स्वच्छतेवर दिले जात आहे. दुकानांमध्ये लाभार्थीसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, दुकानातील धान्याची आवक आणि वितरण यांचे रजिस्टर, स्वच्छता, रंगरंगोटी,
दुकानासमोरील आवश्यक फलक, पात्र लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य वाटप, लाभार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था, आदी निकषांसह ग्राहकांच्या तक्रारी अर्जांचा निपटारा निकषांवर आयएसओ मानांकन करण्यात येणार आहे.