ऍडलेड – ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या एका कामगिरीला त्यांच्याच देशाच्या मार्नस लेबुशेनने मागे टाकले आहे. लेबुशेनने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळताना हा विक्रम साकार केला.
ब्रॅडमन यांनी कारकिर्दीतील विस कसोटींचा पल्ला जेव्हा पार केला होता तेव्हा 15 अर्धशतके नोंदवली होती. लेबुशेनने 17 वे अर्धशतक पूर्ण करत या कामगिरीला मागे टाकले. तसेच प्रकाशझोतात होत असलेल्या गुलाबी चेंडूरील कसोटीत तीन शतके साकार करणारा लेबुशेन पहिलाच फलंदाज ठरला आहे.
तसेच आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सहा शतके फटकावणारा इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटसह लेबुशेन दुसराच फलंदाज ठरला आहे. लेबुशेनने कसोटी कारकिर्दीत 2 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.