अमेरिकेत मायक्रोसॉफ्टला मागे टाकून ओरॅकलने मिळवले टिकटॉक

वॉशिंग्टन – टिकटॉक हे लोकप्रिय व्हिडिओ ऍप चालवण्याचे अधिकार अमेरिकेत ओरॅकल कंपनीने मिळवले आहेत. हे अधिकार मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ही कंपनीही स्पर्धेत होती; पण ओरॅकलने टिकटॉक विकत घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे हे ऍप अमेरिकन नागरिकांना यापुढेही वापरता येऊ शकणार आहे. 

ट्रम्प प्रशसनाने या चिनी ऍपवर बंदी घातली होती. तथापि अमेरिकन नागरिकांमध्ये या ऍपची जी लोकप्रियता आहे, ती पाहून ट्रम्प यांनी टिकटॉक अमेरिकेत चालू ठेवायचे असेल तर चिनी कंपनीने ते ऍप अमेरिकन कंपनीला विकण्याचा पर्याय ठेवला होता व 15 सप्टेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा व्यवहार झाला आहे.

वॉलमार्ट या विख्यात रिटेल कंपनीनेही यात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले होते. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने त्यांनी ही गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती.

ओरॅकलला टिकटॉकच्या अमेरिकेतील व्यवसायापुरतेच डील करता आले आहे की संपूर्ण जगातील टिकटॉकचे डील त्यांनी केले आहे याची माहिती मात्र अजून जाहीर झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.