मुंबई – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून ही परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाच्या तयारीला लागावे लागणार आहे.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
दहावीच्या परीक्षा या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
त्याचबरोबर इयत्ता 12 वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इयत्ता दहावीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.@scertmaha @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे:#exams #class10 #Class12
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. pic.twitter.com/i0wbWBE9H5
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021