पिंपरी (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तसेच शरद पवार यांच्या 81 वा वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांचा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच या वेळी नाट्य परिषदेशी जोडलेल्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
पिंपरी येथे गुरुवारी (दि. 16) झालेल्या पत्रकार परिषदेस गौरी लोंढे, रुपाली पाथरे, किरण येवलेकर, सुहास जोशी, संतोष शिंदे, सुदाम परब, राहुल भोईर, ललित थोरात उपस्थित होते.
भोईर म्हणाले, या संस्थेने गेल्या 25 वर्षांत सातत्याने विविध कार्यक्रमांद्वारे पिंपरी चिंचवड परिसरातील प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम केले आहे.संस्था स्थापनेपासून सुरू केलेले कार्यक्रम नंतर आशा भोसले पुरस्कार, बालनाट्य शिबिरे, बालनाट्य स्पर्धा, राज्यस्तरीय राम गणेश गडकरी करंडक एकांकिका स्पर्धा, नामांकित कवींचा सन्मान, वर्धापन दिनी ज्येष्ठ आणि उभरत्या रंगकर्मींचा गौरव असे विविध कार्यक्रम वर्षभर असतात. शनिवारी (दि. 18) व रविवारी (दि. 19) हा नाट्य महोत्सव चिंचवड गावातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता “मोरुची मावशी’ आणि रविवारी “तु म्हणशील तसं!’ हे नाटक होणार आहे.
यावेळी मित्र मंडळ, चिंचवड, वसंतराव देशपांडे मेमोरीअल फउंडेशन, वसंतराव जोशी संस्था, कलारंग, नादब्रह्म, अथर्व नाट्य, टेल्को कलासागर, नृत्य संस्था, कर्तव्य फाउंडेशन, नाट्य सिंधू, कलापिनी, समाधान गुडदे संस्था, थिएटर वर्कशॉप कंपनी, विकासनगर संगीत विद्यालय शिधये संस्था, गुरुकृपा संगीत क्लास, आकांक्षा इव्हेंट ऑर्गनायझेशन, आमचे आम्ही संस्था, प्रयोग थिअटर्स संस्था, स्वरसादना संगीत विद्यालय, जटायू कल्चलर ऍकॅडमी, नृत्य शारदा कला मंदिर, कोकरे मंडप, गवळी मंडप, रेझोनन्स स्टुडीओ, सिनेरियो प्रोडक्शन्स या संस्थांचा आणि सुधाकर चव्हाण, विजय जोशी, उमा खापरे, वैशाली मराठे, राजाभाऊ गोलांडे, धोंडीबा सायकर, मधू जोशी, मंजुश्री दिवाण, पुरुषोत्तम सदाफुले, उद्धव कानडे, स्वाती पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, शंतनु गटणे, शंकर मराठे, सुभाष चव्हाण, पाचंगे परिवार, विवेक क्षीरसागर, तेजश्री अडीगे, वैशाली पळसुले, शरद भगत, माऊली काळे, अतुल पंढरपुरे, अनुप कोठावळे, फिरोज मुजावर, मनोज कांबळ, आशा देशमुख, मीनाक्षी आठवले, संगीता लाखे, वैशाली मराठे, राम माळी, आसाराम कसबे या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार, असे भोईर यांनी सांगितले.