मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री “मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
दरम्यान, नुकतंच मौनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला एका चाहत्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे ती प्रचंड घाबरली असल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ जुहूमधील एका डबिंग स्टूडिओ बाहेरील आहे. या व्हिडीओमध्ये मौनीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. दरम्यान एका चाहत्याने मौनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
मौनी घाबरते आणि ‘अरे…’ इतकच बोलून तेथून निघून जाते. यावेळी मौनीने व्हाईट कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये मौनी अतिशय ग्लॅमर्स दिसते.
दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत मौनीला पाठींबा दिला आहे. “चाहत्यांनी आपल्या सीमा ओलांडू नयेत’ असे सुद्धा अनेकांनी म्हंटले आहे. लाखोंच्या संख्येने मौनीचे फॅन्स आहेत. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर काही मादक आणि ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते.