पुणे – मित्राने वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह पुण्यातील एका २२ वर्षीय तरुणीला जंगलात नेऊन त्याठिकाणी तिला दारु पाजून त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पाेलीसांकडे २२ वर्षीय पिडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पाेलीसांनी शुभम सिताराम शिंदे (वय-१९,रा.धनकवडी,पुणे) या आराेपीला जेरबंद केले आहे.
आराेपी शुभम शिंदे याने पाच डिसेंबर राेजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टाॅप याठिकाणी भेट असे सांगितले. त्यानंतर प्रतिक माने या मित्रासह शिंदे तरुणीला भेटला व सदर तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेली. त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झाेपली हाेती.
त्यावेळी आराेपी शिंदे याने तिच्याशी जवळीक साधत तरुणी प्रतिकार करत असताना ही तिला विवस्त्र करत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत तरुणीने घडलेल्या प्रकाराची कुटुंबीयांशी चर्चा करुन पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलीसांनी आराेपीला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक स्वाती देसाई करत आहे.