बीजिंग – चिनी कंपन्यांकडून परदेशी कामगारांची पिळवणूक होत असल्याच्या लाओस मधील शेकडो उदाहरणे पुढे येत आहेत. वांधकाम क्षेत्रात 6 वर्षांपूर्वी कामावर घेतलेल्या कामगारांना अजून त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत.
या कामगारांनी 2015 मध्ये केलेल्या कामाचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. एका धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी घरे बांधण्याच्या प्रकल्पावर हे कामगार काम करत होते. पण असा स्वरुपाचे हे एकमेव उदाहरण नाही.
यापूर्वी चीन ते लाओसला जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पातील शेकडो कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. या कामगारांनाही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. चीनी कंपन्यांमधील कामगारांबाबतचे तंटे ही नित्याची बाब झाली आहे.
कामगार गांभीर्याने काम करत नाहीत, असे कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे म्हणणे असते. संपूर्ण काम संपेपर्यंत कामाचे पैसेही दिले जाऊ शकत नसतात. त्यानंतर कामगार तंट्यामध्ये पोलिसांना सहबागी करून घेतात, अशी तक्रार कंपन्यांकडून केली जात असते. या कामगारांना कोर्टात जाण्याचा पर्याय खुला असतो, असे हॉंगकॉंगमधील एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.