मुंबई – राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या घटनेत दिवसांदिवस वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागातून रोजच महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न महिलांसह सर्वसामान्यांना पडला आहे. असे असताना मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
A 20-year-old woman was raped and killed by an unidentified person in Kurla area of Mumbai, Maharashtra. The woman's body, which had started decomposing, was found in a vacant building. A case has been registered under Sections 376 & 302 of IPC: Mumbai Police
— ANI (@ANI) November 27, 2021
ही घटना मुंबईतील कुर्ला परिसरात घडली आहे. येथील एचडीआयएल कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्वरित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला.
डॉक्टरांचे अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांंनी अज्ञात आरोपीविरोधात खून व बलात्कार केल्याप्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे. हा प्रकार परिसरातील काही मुले इंस्टाग्रामवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आला त्यानंतर या मुलांनी पोलिसांनी माहिती दिली.