मुंबई – थिएटर इतके दिवस बंद होते म्हणून अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. मात्र, आता थिएटर खुली झाली असून, एकापाठोपाठ एक सिनेमे रिलीज होण्याची घोषणा व्हायला लागली आहे.
या लिस्टमध्ये सर्वात पहिली घोषणा ‘सूर्यवंशी’ची झाली. त्यापाठोपाठ रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या “83′ ची आहे. 24 डिसेंबर रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येणार असून, नुकतंच “83’ चा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
View this post on Instagram
दीपिका पादुकोणनं तिच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचा टीजर पोस्ट केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, सिनेमा 24 डिसेंबर 2014 रोजी रिलिज होतोय तर ट्रेलर 30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलिज होणार आहे.
“83′ सिनेमात अभिनेता रणवीर सिंह माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. तसेच, दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीही आहे.