बुलडाणा – काल उल्हासनगरमध्ये 22 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यामधून भाजप सावरत नाही तोवर आज पुन्हा बुडलढाण्यातील चिखली येथील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा हात पकडला आहे. तेव्हा सलग दुसरा झटका भाजपला बसला आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. यामध्ये चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. चिखली शहरातील बोंद्रे यांच्या प्रवेशामुळे शहरातील पक्षाला बळ मिळणार आहे.
चिखली शहरातील एक जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद पाणि पुरवठा सभापतींसह काही पंचायत समिती सदस्य आणि शेकडो भाजपचे कार्यकर्ते कॉंग्रेसनेत्या यशोमती ठाकून यांच्या उपस्थितील हा पक्षप्रवेश होणार आहे.