नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये एका तरुणीवर तिच्या एक्स बॉयफ्रेण्डने भररस्त्यात चालूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक्स बॉयफ्रेंडने युवतीला भेटण्यासाठी घरी बोलावले आणि त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करुन हत्या केली. हा प्रकार दिल्लीच्या द्वारका जिल्ह्यात घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेचा धरार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
दिल्ली के बिंदापुर में सिरफिरे आशिक़ ने लड़की पर चाकू से हमला किया। हमले में लड़की की मौत। दो लड़के आरोपी से लडकी को बचाने की कोशिश भी कर रहे है लेकिन आरोपी अंकित हमला कर फ़रार हो गया। pic.twitter.com/ujOuHOkXH1
— Jitender Sharma (@capt_ivane) October 19, 2021
अंकित गाबा असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर आरोपीने पळ काढला आहे. 24 वर्षीय मृत युवतीचे नाव डॉली आहे. घटनास्थळी आरोपीसोबत हिमांशू आणि मनीष नावाची आणखी दोन मुलं होती.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, एक्स बॉयफ्रेण्डसह आणखी दोन तरुणांबरोबर युवतीची बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी तरुणीवर चाकूने एकामागून एक वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणी जमिनीवर पडते. त्यानंतरही तरुण तिचे केस पकडून तिच्यावर हल्ला करत राहतो. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोन तरुण आरोपीला थांबवताना दिसत आहेत. ते त्याला हल्ला करण्यापासून रोखत आहेत. मात्र हल्ला करणारा तरुण सतत तिला भोसकत राहतो.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेली युवती स्वत: हॉस्पिटलला चालत गेली परंतु तिचा जीव वाचू शकला नाही. अत्यंत गंभीर अवस्थेत युवती जेव्हा हॉस्पिटलला पोहचली तेव्हा हॉस्पिटलने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणात कुठेही पीसीआर कॉल अथवा तक्रार दाखल झाली नाही.
पोलीस या प्रकरणातील आरोपी अंकित गाबा आणि त्याचे दोन साथीदार यांचा शोध घेत आहेत. सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत. पुढिल तपास पोलीस करत आहेत.