मुंबई – घर विक्री वाढण्यास मदत व्हावी या हेतूने बॅंक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. आता हा व्याजदर 6.50 टक्के इतका केला आहे.
अगोदर या बॅंकेचा गृहकर्जावरील व्याजदर 6.75 टक्के इतका होता. मात्र ही दरकपात मर्यादित कालावधीसाठी करण्यात आली असून ग्राहकांना फक्त 31 डिसेंबरपर्यंत कमी व्याजदराचा लाभ घेता येणार असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे. नव्या गृहकर्जासाठी तसेच कर्जाच्या हस्तांतरणासाठीही योजना लागू आहे.
बॅंकेचे महाव्यवस्थापक एच टी सोळंकी यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांनी घरखरेदीचा निर्णय घ्यावा यासाठी आम्ही व्याजदरात कपात केली आहे. आता आमचे व्याजदर स्पर्धात्मक आहेत. त्याचबरोबर गृहकर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्काची योजना चालू असून या योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.