मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गॅंगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लॉंडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. आज त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गॅंगचा मोठा फायनान्सरही होता.
2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती.