नाशिक – नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेले नाही. पण पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
संबंधित घटना ही नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावात घडली आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये 34 वर्षीय शंकर महाजन, त्यांचा 4 वर्षीय मुलगा पृथ्वी महाजन आणि 3 वर्षीय मुलगी प्रगती महाजन यांचा समावेश आहे.