पुणे – आगामी काळातील गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यांसारखे उत्सव व सणांच्या काळात बाजारपेठेतील खरेदी विक्री विचारात घेऊन कॉसमॉस बॅंकेने ग्राहक व ग्राहकेतर तसेच व्यापारी वर्गासाठी कोविडच्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करत, कॉइन (नाणी) एक्सचेंज उपक्रमाचे आयोजन 3 व 4 सप्टेंबर रोजी केले होते.
सदर उपक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बॅंकेचे जनरल मॅनेजर (इश्यू डिपार्टमेंट) मनोज रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रिझर्व्ह बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी संघर्ष बोरसे तसेच रोहन वेदपाठक उपस्थित होते. रिझर्व्ह बॅंक बेलापूरच्या विशेष सहकार्याने व बॅंकेच्या करन्सी चेस्ट विभागातर्फे युनिव्हर्सिटी रोड, चिंचवड, पर्वती दर्शन, लक्ष्मी रोड या शाखांमध्ये कॉइन एक्सचेंज उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुटया नाण्यांची आवश्यकता विचारात घेऊन रू.1,2,5 व 10 या नाण्यांचे वितरण मोठया प्रमाणात करण्यात आले. एकूण 50 लाख रूपयांच्या नाण्यांचे वाटप ग्राहकांना करण्यात आले. सदर उपक्रमास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
बॅंकेतर्फे पुन्हा लवकरच दिवाळीच्या आधी सर्व शाखांमध्ये कॉइन एक्सचेंज उपक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न असल्याचे बॅंकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अर्चना जोशी यांनी सांगितले. कॉइन एक्सचेंज उपक्रमाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बॅंकेच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर अपेक्षिता ठिपसे व जनरल मॅनेजर अविनाश चव्हाण तसेच करन्सी चेस्टचे मॅनेजर नंदकिशोर चांदेकर व बॅंकेचे अनेक मान्यवर, ग्राहक उपस्थित होते.