साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त : चार दिवसांत दुसऱ्यांदा छापा
सोनई –चांदा येथे कार्यरत असलेल्या कत्तलखाना रॅकेटवर सोनई पोलिसांनी चार दिवसांत दुसऱ्यादा छापा टाकला. या छाप्यात दीड लाख रुपये किंमतीच्या दहा गाईची सुटका करण्यात असून वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकअप असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गाई ताब्यात घेऊन मढी येथील गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आल्या. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व परिसरातील वाढत्या तक्रारीनंतर व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश दिल्या.
सोनई पोलिसांनी चार दिवसांपूर्वी कुरेशी मोहल्यात छापा टाकून सुमारे 19 लाखांचा ऐवज जप्त केला होता. शनिवारी पुन्हा शास्त्रीनगर येथील गाढवे वस्तीजवळ चांदा येथे एका शेतात लपवुन ठेवलेला दीड लाख रुपये किंमतीच्या दहा गाई त्यात पाच गावरान व पाच जसी गाईची सुटका करण्यात आली.
गाई मालकाबाबतीत चौकशी केली असता ही जनावरे ही अताऊला शब्बीर पठाण (रा.चांदा) यांच्यासह सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.