बीड – राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी (दि.३) बीड आरटीओ कार्यालयाला भेट देत येथील टेस्ट ट्रॅक, कार्यालयातील सोयी – सुविधा, कार्यालयाच्या नवीन जागेची पाहणी केली. यावेळी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने, रविकिरण भड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी कार्यालयाच्या सर्व अडी अडचणी समजून घेतल्या.
यावेळी त्यांनी वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी व नागरिक यांच्याशी संवाद साधला. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी बीड कार्यालयाचा पदभार हाती घेतल्यानंतर बीड मध्ये लायसन्स, वाहणासंबंधीचे कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. ढाकणे यांनी कार्यालयाच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयातून लागणारी मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले.