सातारा – साताऱ्यात तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणाचे चार दिवसांपुर्वीच लग्न झाले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेत तरुणानेच प्राण वाचविले आहे. कौटुंबीक वादातून मानसिक ताण निर्माण झाल्यानं तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा तरुण सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात वास्तव्याला आहे. मात्र त्याने लग्नाच्या अवघ्या चारच दिवसातच हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची सुखरूप सुटका झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, पोलीसांनी तरुणास समुपदेशन करत मानसिक आधार दिला आहे. तसेच आत्महत्या न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.