मुंबई – सारा अली खान सध्या आपल्या मैत्रिणींबरोबर लडाखच्या ट्रीपला गेली आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती सारखी सोशल मीडियावर अपलोड करते आहे. लडाखमधील निसर्गरम्य डोंगरांवर आणि झऱ्याच्या किनाऱ्यावर ती निवांतपणे विहार करताना या फोटोंमध्ये दिसते आहे.
एका फोटोमध्या ती एकटीच एका सरोवराच्या किनाऱ्यावर निवांत बसलेली दिसते आहे. या फोटोत ती एखाद्या विचारवंतासारखी दिसते आहे. कोणताही ताण तणाव तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे. सारा अधून मधून अशीच हिंडायला जात असते.
लॉकडाऊनच्या काळातही तिने मालदिवची दोनवेळेला ट्रीप केली होती. अलीकडेच ती आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिमबरोबर काश्मीरचीही ट्रीप केली आहे. गेल्या वर्षभरापासून अक्षय कुमार आणि धनुषबरोबरच्या “अतरंगी रे’चे शूटिंग संपवण्याशिवाय तिने अधिक कोणतेही काम केले नाही.
“अतरंगी रे’चे शूटिंग मार्च महिन्यातच संपवल्यानंतर सारा खूपच निवांत झाली आहे. म्हणूनच ती लडाखला हिंडायला निघून आली आहे. लवकरच “अतरंगी रे’ रिलीज होईल. मग कदाचित ती पुढच्या सिनेमाच्या तयारीला सुरुवात करेल.