मुंबई : केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणेंनी खळबळजनक आणि वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानावर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेने आता नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत” असे म्हणत निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांनी राणेंच्या विधानावर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. “दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना रोज मुजरा करावा लागतोय. मंत्रीपद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मातोश्रीवर टीका करावीच लागणार आहे आणि तसं केलं नाही तर त्यांचे मंत्रीपद देखील टिकणार नाही” असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
मातोश्रीवर टीका केली तरच मंत्रीपद राहणार!नारायण राणे यांचा #फुगा फुटलेला आहे आणि तो शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत! दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना #रोज #मुजरा करावा लागतोय! मंत्रीपद टिकवण्यासाठी #मुख्यमंत्री #उद्धवजीठाकरे व #मातोश्रीवर टीका करावीच लागणार! pic.twitter.com/XlUJTt1E5A
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) August 23, 2021
मनीषा कायंदे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये “नारायण राणे यांचा फुगा फुटलेला आहे आणि तो सामान्य शिवसैनिकांनीच फोडलेला आहे आणि सध्या ते ऑक्सिजनवर आहेत. दिल्लीश्वरांच्या समोर त्यांना मुजरा करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतंही काम राहीलेलं नाही. त्यांच्यावर एकच जबाबदारी दिली आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करा. मातोश्रीवर टीका करा आणि शिवसेनेवर टीका करा. हेच त्यांचं ऑक्सिजन आहे. आणि हे त्यांनी केलं नाही तर त्यांचं मंत्रीपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावंच लागणार त्यामुळे नारायण राणे काय करतायत त्याची आम्हाला अजिबात चिंता नाही” असे म्हटले आहे.
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली