पेट्रोल-डिझेलची घरपोच सेवा; गुजरातमधील चार युवकांचा अनोखा स्टार्ट अप

बडोदा – करोना महामारीच्या काळात रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने गुजरात मधील चार युवकांनी एका अनोख्या स्टार्टअप ची सुरुवात केली आहे या स्टार्टअप च्या माध्यमातून हे युवक ग्राहकांना घरपोच किंवा जागेवर पेट्रोल आणि डिझेल चा पुरवठा करत आहेत.

ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा पेट्रोल पंपाची सुविधा उपलब्ध नसते अशा वेळी त्या भागांमध्ये प्रवास करणाऱ्याना जर अचानक पेट्रोल किंवा डिझेल ची गरज भासली तर त्यांना शहरापर्यंत जाऊन पेट्रोल-डिझेल आणावे लागते हीच समस्या लक्षात घेऊन बडोद्यातील या युवकांनी घरपोच किंवा जागेवर पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्याचा स्टार्टअप सुरू केला आहे.

संपूर्ण गुजरात आणि गुजरातच्या सीमांना लागून असलेल्या राज्यांच्या प्रदेशांमध्ये हे युवक पेट्रोल-डिझेलचा ऑन डिमांड किंवा घरपोच पुरवठा करत आहेत या उपक्रमातून ते दर वर्षी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवत आहेत. अमेरिकेत शिक्षण घेऊन आलेला सपन पटेल त्याच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि

आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने त्याने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली काही वर्षापूर्वी सपन आणि मित्र राजस्थानात फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्या गाडीतील पेट्रोल अचानक संपले. त्यानंतर हे पेट्रोल मिळवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर धावाधाव आणि परिश्रम करावे लागले त्यानंतरच सपन च्या डोक्यात अशा प्रकारे घरपोच पेट्रोल देण्याचा स्टार्टअप सुरु करावा ही संकल्पना आली मित्रांना विश्वासात घेऊन त्याने ही संकल्पना मांडल्यानंतर त्यांनीही त्याला पाठिंबा दिला.

या मित्रांनी मिळून फुएली नावाच्या कंपनीची स्थापना केली असून त्यासाठी 50 लाख रुपयांचे भांडवल उभे केले आहे प्रारंभीच्या काळात सपन आणि त्याचे मित्र आपल्या कंपनीच्या माध्यमातून बडोदा शहरातील हॉस्पिटल्स हॉटेल्स आणि छोट्या घरांना आणि बंगल्याना पेट्रोलचा पुरवठा करत असत त्यानंतर त्यांच्या कंपनीची मागणी वाढल्याने गुजरातच्या इतर भागांमध्ये आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये ही त्यांनी पेट्रोल घरपोच प्रारंभ केला.

भारतातील प्रमुख तेल कंपन्यांकडून थेट पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून स्वतःच्या टँकरच्या माध्यमातून सपनची कंपनी पेट्रोल डिझेलचा पुरवठा करतात त्यामुळे ग्राहकांना बाजार भावाच्यातच घरपोच पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होते ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलचा पुरवठा करण्यासाठी एक टॅंकर राखीव ठेवण्यात आला आहे.

ग्राहकाने ऑर्डर बुक केल्यानंतर 30 मिनिटाच्या आत त्याला त्याने सांगितले या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जातो या स्टार्टअप ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने लवकरच देशाचा इतर भागांमध्येही ही संकल्पना राबवण्याचा विचार सपन पटेलने बोलून दाखवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.