अकोला – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेंसवर टीका केल्यानंतर मनसे व राष्ट्रवादी यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळाले आहे. असे असताना आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे ..अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे ..
राज ठाकरे यांनी ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
…म्हणून जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका https://t.co/pmyYmFUL59@RRPSpeaks @NCPspeaks
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 21, 2021