मुंबई – सारा अली खानने आतापर्यंतच्या तिन्ही सिनेमांमध्ये बबली अवतार दाखवला आहे. आता ती आपली ही प्रतिमा बदलणार आहे. डिस्कव्हरी प्लसवरील “मिशन फ्रंटलाइन’ या नवीन शो मध्ये ती चक्क लेडी कमांडो म्हणून दिसणार आहे. या नवीन सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये ती कमांडोच्या रोलमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
त्यासाठी सारा आसामच्या वीरांगना फोर्सबरोबर सहभागी झाली आहे. या दलाबरोबर ट्रेनिंग पूर्ण करून मिशन पूर्ण करतानाही सारा दिसणार आहे. वीरांगना फोर्स ही भारतातील पहिली केवळ महिलांची कमांडो फोर्स आहे. या विशेष दलाची स्थापना 2012 मध्ये झाली होती. या कमांडो फोर्सच्या ट्रेनिंगची एक झलक साराला दाखवावी लागली.
प्रस्तरारोहण, निःशस्त्र लढाई आणि फायरिंगची प्रात्यक्षिके तिला करून दाखवावी लागली आहे. यासाठी तिला फुल कमांडोंच्या वेशभुषेत हे ट्रेनिंग करावे लागले. तिला प्रथमच खऱ्या खुऱ्या
बंदुकीतून फैरी झाडाव्या लागल्या आणि त्याची आपल्याला खूप भीती वाटली असे तिने मान्यही केले. वर्कफ्रंटवर ती अक्षयकुमार आणि धनुषबरोबर “अतरंगी रे’मध्ये दिसणार आहे. याशिवाय विकी कौशलबरोबर “द इमॉर्टल अश्वत्थामा” मध्येही दिसणार आहे.