नवी दिल्ली –जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे डॉलर वधारत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण चालूच आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 176 रुपयांनी कमी होऊन 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 898 रुपयांनी कमी होऊन 61,765 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,735 डॉलर तर चांदीचा दर 23.56 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. डॉलर वधारत असल्यामुळे सध्या सोन्याचे दर पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल
यांनी सांगितले.