जपानमधील टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा उत्साहात सुरु आहेत. जगभरातील अव्वल खेळाडू सगळी क्षमता, गुणवत्ता पणाला लावून परस्परांशी स्पर्धा करत आहेत. जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
खेळांवर प्रेम करणारे जगभरातील कोट्यावधी चाहते दूरचित्रवाणीवर आवडत्या क्रीडापटूंची कामगिरी टक लावून पहात आहेत. त्याचबरोबर पदकासाठीच्या पोडियम क्षणभर का होईना आपण उभे आहोत असे चित्र मनातल्या मनात रंगवत आहेत. तर मग क्षणभर गंमत म्हणून तुमच्या राशीवरून तुम्ही कोणत्या खेळात भाग घ्याल हे जाणून घ्या.
मेष – तुम्ही ज्युदो खेळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तुमचा आक्रमक आणि जिद्दी स्वभाव लक्षात घेता तुमच्यासाठी हाच योग्य खेळ आहे. त्यातून तुमची दृढता दिसून येते. तुमचे विरोधक तुमचा पवित्रा पाहूनच तुमची ताकद जोखतील.
वृषभ – तिरंदाजी हाच तुमच्या स्वभावाचा खेळ आहे. कारण तुम्हांला जे हवे असते त्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही ते मिळवताच. माशाचा डोळा फोडणे हे तुमच्यासाठी सोपे लक्ष ठरते कारण जोपर्यंत लक्ष्य साध्य होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणे हा तुमचा स्वभाव आहे.
मिथुन – हास्यविनोद आणि चेष्टामस्करी ही तुमची खासियत आहे. त्यात तुमचा हात कुणी धरू शकत नाही. त्यामुळेच तलवारबाजी हा तुमच्यासाठी परफेक्ट खेळ आहे. कारण समोरा-समोर दोन हात करण्यात तुम्ही फारच तरबेज आहात आणि त्यामुळेच तुमच्या कौशल्याने प्रतिस्पर्धी चकीत होईल.
कर्क – पाणथळ जागेत राहणाऱ्यांसाठी ऑलिंपिकमध्ये वॉटरपोलोसारखा योग्य खेळ नाही. अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना रोखून धरण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे. अतिशय कौशल्याच्या आणि टीमवर्क असलेल्या वॉटरपोलोमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.
सिंह – तुमच्या स्वतःकडून आणि इतरांकडूनही नेहमीच जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे नेहमीच्या ट्रायथलॉनपेक्षा आधुनिक पेंटाथलॉन तुम्हांला शोभून दिसतो. त्यामध्ये पाच खेळात तुम्हांला कसब दाखवण्याची संधी मिळते. तलवारबाजी, जलतरण, अश्वारोहण, नेमबाजी आणि धावणे अशा सर्वांगीण क्रीडाप्रकारांमध्ये तुम्ही निश्चितपणे सरस ठरू शकता.
कन्या – नेमकेपणा अचूकता तुमच्या नसानसात भिनलेली असते. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे टेनिसमध्ये दिमाखदार कामगिरी करू शकता. अगदी आंग्रे अगासी किंवा रॉजर फेडररसारखे विजय मिळवू शकता. तरुणींसाठी अना कुर्निकोवा किंवा मारिया शारापोवाच कोर्टवर अवतरतील.
तूळ – तुमचे संतुलित व्यक्तिमत्व तुम्हांला तालबद्ध जिम्नॉस्टिकमध्ये अचूक कामगिरी करण्यासाठी पूरक आहे. संतुलन आणि योग्य ठिकाणी अचूक वेळी हजर व्हायचे तुमचे कौशल्य या खेळात निश्चित उपयोगी पडू शकते.
वृश्चिक – तुमचा मनावर ज्याप्रमाणे ताबा असतो त्याप्रमाणेच नौकची सूत्रे आणि नियंत्रण तुम्ही अगदी सहजपणे सांभाळू शकता. नियंत्रण आणि चलाखी या गोष्टीत तुम्ही तरबेज असल्याने नौकानयनात तुम्ही नक्कीच सुवर्णपदक मिळवू शकता.
धनू – दिमाखात आणि पूर्ण नियंत्रण ठेवून घोड्यावर कसे स्वार व्हायचे याचे तुम्हांला चांगले ज्ञान आहे. आतापर्यंत जीवनाच्या घोड्यावर पक्की मांड ठेवून तुम्ही त्याला योग्य मार्गावर ठेवले आहे. त्यामुळेच ऑलिंपिकमध्ये अश्वारोहणात तुम्ही सगळ्यांना चकीत करू शकता.
मकर – तुमच्याकडे विलक्षण संयम आहे. आधीच अचूक अंदाज घेऊन परस्थितीवर मात करण्याची हुशारी आहे. त्याचबरोबर कठोर मेहनत आणि लक्ष केंद्रीत करून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची वृत्ती पाहता गोल्फ हा खेळ तुमच्यासाठी योग्य आहे. कारण केव्हा थांबायचे आणि केव्हा अचूक शॉट मारायचा हे तुम्हांलाच कळते.
मकर – सतत न थकता उसळी घेत राहणे आणि प्रत्येकवेळी नवी उंची गाठण्याचा तुमचा प्रयत्न नेहमीच कौतुकास्पद असतो. त्यामुळे ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकमध्ये तुम्ही नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करू शकता.
कुंभ – संवेदनशीलता आणि बुद्धीमत्ता ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही तुमच्यासारख्या लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करता. त्यामुळेच फुटबॉलसारख्या सांघिक खेळात तुम्ही चमकदार कामगिरी करू शकता.
मीन – मदतशीलता आणि सहकार्य हे गुण तुमच्यामध्ये असल्याने समन्वयात्मक जलतरण (सिन्क्रोनाईज्ड स्विमिंग) या सांघिक क्रीडा प्रकारात तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकता. नेहमीच्या जीवनातही तुम्ही सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त समन्वय राखून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असता. या गुणाचा खेळातही निश्चितच उपयोग होईल.