डोंबिवली – जगभरात करोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा फटका भारताला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. देशात करोनामुळे गेली अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे करोना सोबतच आर्थिक नुकसानीचा सामना सर्वांना करावा लागत आहे. करोनामुळे सततच्या लॉकडाऊनमुळे डोंबिवलीतील एका व्यापारी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सूरज सोनी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा रस्त्यावरील दावडी गावातील सूरज रहिवासी होता. सूरजचा डोंबिवली परिसरात मोबाईल विक्री-दुरुस्तीचा व्यवसाय होता. मात्र सततच्या लॉकडाऊनमुळे तो आर्थिक संकटात सापडला त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.