पुणे –करोना प्रतिबंधक लसीचे शनिवारी केवळ “कोवॅक्सिन’ डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध असतील.
18 वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी “कोवॅक्सिन’चा जो पहिला डोस मिळेल, त्यातील 20 टक्के लस ऑनलाइन बुकिंग, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 3 जुलैपूर्वी “कोवॅक्सिन’चा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना शनिवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.