पुणे –पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचणे, खड्डे, वाहतूक कोंडी आदी समस्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले होते. परिणामी, पुणेकरांची तारांबळ उडाली. यांसह विविध रस्ते जलमय झाले होते. यातून नागरिकांना वाट काढण्यासाठी कसरत करावी लागली.
शुक्रवारी शहरात वाहतूक संथ सुरू होती. विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. प्रामुख्याने नारायण पेठ, सदाशिव पेठ, शनिपार, मंडई, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लकडी पूल, डेक्कन, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, फर्गुसन महाविद्यालय रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, कर्वे रस्ता, एरंडवणे या भागांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप
शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. पर्यायाने रस्त्याला नाल्यांचे स्वरुप झाले होते. काही रस्त्यांवर ड्रेनेज “ओव्हर फ्लो’ झाले नसल्याने, ड्रेनेजचे पाणी देखील रस्त्यावर आले होते. तर अंतर्गत रस्त्यांवरही अधिक पाणी साचले होते.