थिरुवनंतपूरम – देशातला पहिला करोना रुग्ण केरळात आढळून आला होता. हाच रुग्ण आज पुन्हा करोना पॉझिटिव्ह झाल्याचे वृत्त आहे. थ्रिुसुर येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक महिला रुग्ण असून, पुन्हा तिचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दिल्लीला शिक्षणासाठी जाण्यासाठी म्हणून या महिलेने आपली आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात ही बाब निष्पन्न झाली आहे. सध्या तिच्या घरातच क्वॉरंटाइन असून, तंदुरुस्त आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. ती वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती.