नागपूर – उपराजधानीत गुन्हेगारीचे सत्र चालूच असल्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. शहरात पुन्हा एकदा गँगवारची घटना उघडकीस आली आहे. कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडली आहे.
अक्षय जयपुरे असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव असून त्याच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे दाखल होते. सहा महिन्याआधीच तो जेलमधून बाहेर आला होता.
काल रात्री 10 च्या सुमारास पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. अवैध दारु विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.
बुधवारी रात्री अक्षय हा पांढराबोडी परिसरात आल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानंतर चौघांनी जाऊन अक्षयला घेरले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून पळून गेले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला आहे.