लंडन : ब्रिटनमधील आरोग्य सचिवांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे समाजमाध्यमांवर धुमाकूळ माजला आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक आपल्या महिला सहकाऱ्याला चुंबन घेताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मॅट हॅनकॉक हे आपल्या एका महिला सहकाऱ्याला किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 6 मे रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना लंडनमधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयाबाहेरील आहे.
Got to feel for Matt Hancock’s wife. Not because of this, just in general, been with someone who kisses like a Thunderbird for 15 years pic.twitter.com/9av6k2nocK
— Luke Cope (@Copozade) June 26, 2021
व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातून मॅट हॅनकॉक यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र राजीनामा देण्यास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. याउलट ‘करोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही, त्यामुळे माफी मागतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.