हंगेरी – यूरो करंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटल्याने तीन संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालचा बाद फेरीत प्रवेश झाला आहे.
स्पर्धेच्या 30 व्या मिनिटाला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल झळकावत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सने पहिल्या हाफमध्ये अखेरच्या क्षणी गोल करत बरोबरी साधली. फ्रान्सच्या करीम बेन्झेमा याने गोल मारत संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी दुसऱ्या हाफमध्ये चांगलीच लढत दिली.
दुसऱ्या हाफमधील 47 व्या मिनिटाला फ्रान्सच्या करीम बेन्झेमाने आणखी गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे आधीच जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या पोर्तुगाल संघासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. 60 व्या मिनिटाला ख्रिस्तियाने रोनाल्डोने गोल केला व संघाला बरोबरी साधून दिली. हा गोल रोनाल्डोने पेनल्टीमध्ये केला. अन्य गटातील जर्मनी व हंगेरी यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल नोंदवले.
पहिल्या हाफमध्ये हंगेरीने 11 व्या मिनिटाला गोल केला. हंगेरीच्या ऍडम स्झालई याने पास केलेला बॉल थेट गोलमध्ये रूपांतरित झाला. पिछाडीवर पडलेल्या दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीने जोरदार पुनरागमन केले. 66 व्या मिनिटाला केय हावर्त्झने गोल करत बरोबरी साधली.
त्यानंतर दोन मिनिटांनी म्हणजेच 68 व्या मिनिटाला हंगेरीच्या अंद्रास शेफरने गोल करत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने आक्रमक खेळी करत बरोबरी साधली. अखेर 84 व्या मिनिटाला जर्मनीला यश आले. जर्मनीच्या लिओन गोरेटझ्काने गोल मारला आणि जर्मनीच्या चाहत्यांनी मैदानभर जल्लोष केला.