करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शूटिंग करायला परवानगी नव्हती. मात्र, आता हळूहळू सगळे निर्बंध शिथिल व्हायला लागले आहेत. याबरोबरच शाहरूख खानने आणखी एक गुड न्यूज आपल्या फॅन्सबरोबर शेअर केली आहे याबरोबरच आपण लवकरच पुन्हा काम सुरू करणार असल्याचेही सांगितले आहे.
जे लोक आता पुन्हा कामाला सुरुवात करणार आहेत, त्यांना शाहरूखने शुभेच्छाही दिल्या आहेत. याबरोबर त्याने सावधगिरी बाळगण्याची सूचनाही दिली आहे. शाहरूख खानने आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. आता दाढी करायची वेळ आली आहे, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक महिने झाले दाढी केली नाही.
आता दाढी ट्रीम करायची वेळ आली आहे. असे सांगून त्याने गुळगुळीत दाढी केलेला एक जुना फोटोही शेअर केला आहे. दाढीच्या मापाने दिवस आणि महिने मोजले जातात, हे आता आपल्याला पटले आहे. आता शाहरूख पुन्हा कामाला सुरुवात करणार म्हणजे तो “पठाण’च्या कामाला सुरुवात करणार आहे. यापूर्वी सर्वात शेवटी तो “झिरो’मध्ये कॅट्रिना आणि अनुष्काच्याबरोबर दिसला होता.