कानपूर – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पण चिमुकल्यांना अजूनपर्यंत लस दिली जात नाही आहे. त्यामुळे आता जगातील पहिले कोरोना लसीची चाचणी दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कानपूरमध्ये केली जात आहे.
आतापर्यंत या वयोगतील मुलांवर कोरोना लसीची चाचणी झाली नव्हती. भारत बायोटेकेची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची चाचणी अशा लहान मुलांवर करण्यास सुरुवात झाली आहे. आता सहा वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंत आणि 12 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा लस दिली आहे. तसेच पुढील महिन्यात कोव्हॅक्सिनचा नेजल स्प्रे उपलब्ध होईल, अशी आशा आहे.
आर्यनगर स्थित प्रखर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीची अगदी लहान मुलांवर ट्रायल सुरू झाली आहे. त्यामध्ये दोन वर्षांपासून ते सहा वर्षांपर्यंत, सहा वर्षांपासून ते 12 वर्षांपर्यंत आणि 12 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंत असे तीन गटात विभाजन केले आहे. पहिल्या दिवशी 2 ते 6 वर्षांच्या 30 मुलांचे स्क्रीनिंग करण्यात आले. निवडक 20 जणांना लसीचा डोस दिला गेला.
त्यानंतर सहा ते 12 वर्षांच्या 10 मुलांचे स्क्रीनिंग केली आहे. यामधील पाच जणांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर 45 मिनिटांपर्यंत मुलांना देखरेखीखाली ठेवण्यात आले. सर्वजण लस घेतल्यानंतर व्यवस्थित होते, फक्त दोन मुलांना डोस दिल्यानंतर लालसरपणा आला. ही स्थिती सामान्य आहे, असे म्हटले जात आहे.
चाचणीचे मुख्य तपासनीस वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ वी. एन. त्रिपाठी म्हणाले की, दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची ही जगातील पहिलीच चाचणी यशस्वी झाली आहे.