कलर्सवरील डान्स दिवानेचे स्पर्धक प्रत्येक सरत्या एपिसोडसह नृत्याचा दर्जा उंचावत आहेत. निवड झालेले स्पर्धक उल्लेखनीय नृत्य सादर करत आहेत.
पण यावेळी स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे, कारण हे स्पर्धक आता त्यांच्या कोरिओग्राफर्ससोबत नृत्य करणार आहेत.
यामध्ये पहिली आहे थर्ड-जनरेशन स्पर्धक जमना. ती कोरिओग्राफर दीपक सिंगसोबत साडी के फॉल सा या गाण्यावर थिरकली.
दीपकला जमनाचे नृत्य इतके आवडले की त्याने तिला आयकॉनिक गाणे दीदी तेरा देवरमध्ये माधुरी दीक्षित यांनी परिधान केलेल्या साडीसारखीच साडी भेट दिली.
यामुळे प्रभावित झालेले व दीपकसोबत काम केलेले परीक्षक तुषार कलिया हे देखील मंचावर आले आणि त्यांना मिठी मारली.
दरम्यान, फर्स्ट-जनरेशन स्पर्धक गुंजनने तिचे वर्चस्व कायम ठेवले. तिने कोरिओग्राफर रूएल वरिंदानीसोबत नृत्य सादर केले.
त्याने सांगितले की रॅपर डिव्हाइनला त्याने गायलेले गाणे मिर्चीवरील गुंजनचा परफॉर्मन्स दाखवल्यानंतर तो इतका प्रभावित झाला की त्याने सांगितले, जर त्याने ही क्लिप अगोदर पाहिली असती तर गुंजनलाच या गाण्यासाठी निवडले असते.
फायरपॉवर गुंजनचा परफॉर्मन्स इतका परिपूर्ण व प्रभावी होता की सर्व प्रमुख कोरिओग्राफर्सनी एकत्र तिच्या अद्वितीय नृत्यकौशल्याला मानवंदना दिली.
या लहानशा स्पर्धकाने सुशांतसोबत नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानेदेखील आनंदाने त्याला होकार दिला.