सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेल्या रिया चक्रवर्तीला कमबॅक करण्यासाठी खूप खटपट करावी लागली. तिला खूप टीका सहन करावी लागली. एवढेच नाही तर तुरुंगातून आल्यावर तिच्या प्रोफेशनल लाइफवरही खूपच परिणाम झाला होता. मात्र, आता तिच्यासाठी एक दिलासादायक खबर आहे.
View this post on Instagram
“मोस्ट डिजायरेबल वूमन ऑफ 2020′ मध्ये तिला सामील केले गेले आहे. या लिस्टमध्ये ती टॉपवर आहे. तिने तर दिशा पटणी आणि दीपिका पदुकोणलाही मागे टाकले आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेल्या वर्षीच्या मिसेस युनिव्हर्सची तिसरी रनर अप एडलिन कॅस्टलिनो आहे.
View this post on Instagram
दिशा पटणी तिसऱ्या, कियारा अडवाणी चौथ्या आणि दीपिका पदुकोण पाचव्या क्रमांकावर आहे. कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, अनुप्रिया गोएंका, रुही सिंग आणि अवत्री चौधरी अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
View this post on Instagram
रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर “चेहरे’चे शूटिंग संपवले आहे. पण तिला सिनेमाच्या पोस्टरवर स्थान दिले गेलेले नाही. पण ट्रेलरमध्ये ती दिसते आहे. “चेहरे’व्यतिरिक्त तिच्याकडे अन्य कोणताही सिनेमा नाही.