भोर -भोर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेनवडी (रामोशी वाडी, ता. भोर) येथे एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने घरी महिन्यात चार वेळा
जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली असून, याविषयीची फिर्याद भोर पोलिसांत मुलीच्या आईने शनिवारी (दि. 29) दाखल केली असून, आरोपी फरार आहे.
आरोपी विशाल दत्तात्रय चव्हाण (वय 25, रा. वेनवडी, ता. भोर) याने त्याच्या घरी अल्पवयीन मुलीवर चार वेळा अत्याचार केले असून, ही मुलगी गर्भवती आहे.
या विषयी कोणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी तो मुलीला वारंवार देत होता.
याबाबत विशाल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व हवालदार अमोल मुर्हे करीत आहेत.