छोट्या पडद्यावरील लोकप्रिय “अग्गंबाई सुनबाई’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच अडचणीत सापडली आहे. मालिकेतील एका दृश्याबद्दल शिंपी समाजातील बांधवानी आक्षेप घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या मालिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
या मालिकेत कलाकाराने शिलाई मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते.
या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेता अद्वैत दादरकर यानेसुद्धा समाज बांधवांची माफी मागितली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील अद्वैतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अद्वैत या व्हिडिओत म्हणतो की, “हा प्रसंग दाखवण्यामागे कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. आम्हा सर्वांना याबद्दल भयंकर वाईट वाटतंय. आम्हाला चित्रिकरण करताना तसं सांगितलं होतं. हेतू जरी तो नसला तरीदेखील मनापासून माफी मागतो.
यापुढे असं कुठलंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही याची काळजी घेऊ, तसेच मालिकेतील तो प्रोमो काढण्यात आला असून त्या दिवसाचा पूर्ण भाग देखील हटवण्यात आला आहे.’