“हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’ अर्थात “एचएफपीए’ संदर्भात सध्या काही वाद सुरू आहेत. या अनुषंगाने हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रुजने आपले तीन गोल्डन ग्लोब ऍवार्ड परत करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉम क्रूजच्या या घोषणेच्या अगोदर “एमबीसी’ चॅनेलने 2022 मधील गोल्डन ग्लोब ऍवार्ड समारंभाचे प्रसारण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
टॉम क्रूज 1990 मध्ये “बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलाई’ आणि 1997 मधील जेरी मॅंगव्यर’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब ऍवार्ड मिळवला होता.
तर 2000 साली “मॅग्नोलिया’ मधील सहाय्यक अभिनेत्याच्या रोलसाठी ही त्याला पुरस्कार मिळाला होता. “एचएफपीए’ वर वंशवादाचे आणि वशिलेबाजी करण्याचे आरोप झाले होते.
या संस्थेच्या 87 जणांच्या सदस्यांमध्ये एकही कृष्णवर्णीय पत्रकार नसल्याची टीका होते आहे. संस्थेने आपल्या वर्तवणुकीत आणि धोरणात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्याला खूप वेळ लागू शकतो.
त्यामुळे नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉनने देखील “एचएफपीए’ बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉम क्रूज च्या अगोदर स्कारलेट जोहानसन या अभिनेत्रीनेही याचे या संस्थेबरोबर हे बरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.