“श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय, कमजोर तुम्ही नाही तुमची वेळ आहे. तुमचं जीवन हे तुमच्या भविष्यात नाही आणि भूतकाळातही नाही ते या क्षणात आहे. तर हा क्षण जपा.
View this post on Instagram
तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, उगीचच घराबाहेर पडू नका’, असा व्हिडिओ शेअर करत “रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वाने चाहत्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय. सध्या करोनाबाबत लोकांमध्ये ती जनजागृती करत आहे.
View this post on Instagram
तिने चाहत्यांना धीर देणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तिने भगवद्गीतेत श्रीकृष्णाने पांडवाना दिलेल्या एका उपदेशाची आठवण करून दिलीय. या व्हिडिओला तिने “हेही दिवस जातील. सरी सुखाच्या येतील’ असं कॅप्शन दिलं आहे.