अँजलिना जोली, सलमा हायेक यांच्यासारख्या हॉलीवूड कलाकारांच्या बरोबर आता बॉलीवूडमधील एक विनोदी कलाकार असणार आहे. मार्व्हल स्टुडिओच्या आगामी “इटर्नल्स’ या सिनेमात बॉलीवूडमधील हरीश पटेल हा विनोदी अभिनेता दिसणार आहे. हा सिनेमा 5 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
हरीश पटेल एका छोट्या भूमिकेत असेल, असे समजल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. हरीश पटेलने यापूर्वी मिथुन चक्रवर्तीच्या “गुंडा’ या गाजलेल्या सिनेमात इबुक हटेलाचा रोल केला होता.
त्याचा हा रोल खूपच गाजला होता आणि त्याच्या तोंडी असलेला “मॉं मेरी चुडेल की बेटी, बाप मेरा शैतान का चेला’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. त्यानंतरही हरीश पटेलने अनेक सिनेमांमधून् काम केले आहे. मात्र “इटर्नल्स’ मध्ये हरीश पटेल असेल अशी अधिकृत घोषणा अद्याप निर्मात्यांकडून केली गेलेली नाही. हरीश पटेलनेही अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.