भिंड- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी करोनाच्या चाचणीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच एक गर्भवती महिला प्रसूत झाली. यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
ही महिला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने रुग्णालयात पतीसह आली.
तिला प्रसूती कक्षात नेण्यासाठी तिचा पती अक्षरशः याचना करत होता. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱयांना पाझर फुटला नाही. त्यांनी तिला दाखल करून घेगले नाही. अखेर तिने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.
तिच्या या प्रसुतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ही महिला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला रस्त्यावर पडलेली दिसत आहे. तिने तिचा चेहरा साडीने झाकून घेतला आहे. आणखी एक व्यक्ती तिला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरी व्यक्ती नवजात अर्भक घेऊन जवळ उभा आहे, असे चित्रण त्या व्हिडिओमध्ये आहे.
आशा स्वरूपाची ही काही एकमेव घटना नाही.
गेल्या वर्षी नोएडामध्ये याच कारणावरून एक आठ महिन्याच्या महिलेला अनेक रुग्णालयांनी प्रवेश नाकारला होता. अखेर तिचा मृत्यू झाला. मणिपूर मध्येही एक महिलेला वारंवार विनवणी करूनही रुग्णालयात प्रवेश न दिल्याने तिचा मृत्यू झाला होता.