नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येचे रोज नवे उच्चांक स्थापित होत असतानाच आज नव्याने करोनाबाधित होणार्यांची संख्या थोडी घटली आहे. कालच्यापेक्षा आज 363 ने ही संख्या कमी झाली. जिल्ह्यातील नागरीकांनी ‘जनता कर्फ्यु’च्या निर्बधांचे कडक पालन केल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत बाधित होणार्यांची संख्या आणखी कमी होऊन इथे ‘ब्रेक दी चेन’ला संधी मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय सेवेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात आज 1 हजार 968 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 16 हजार 610 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.68 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 3229 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 21 हजार 136 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 49, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 916 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 264 रुग्ण करोनाबाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 174, अकोले 136, जामखेड 26, कर्जत 77, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 59, नेवासा 20, पारनेर 68, पाथर्डी 38, राहाता 67, राहुरी 15, संगमनेर 57, शेवगाव 133, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 11, कँटोन्मेंट बोर्ड 93, मिलिटरी हॉस्पिटल 23, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 312, अकोले 31, जामखेड 03, कर्जत 17, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 54, नेवासा 31, पारनेर 06, पाथर्डी 08, राहाता 91, राहुरी 23, संगमनेर 185, शेवगाव 11, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 55, कँटोन्मेंट बोर्ड 28 आणि इतर जिल्हा 34 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1264 जण बाधित आढळुन आले. मनपा 256, अकोले 32, जामखेड 16, कर्जत 119, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 142, नेवासा 62, पारनेर 61, पाथर्डी 44, राहाता 49, राहुरी 66, संगमनेर 54, शेवगाव 69 श्रीगोंदा 96, श्रीरामपूर 48, कॅन्टोन्मेंट बोर्ड 05 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 374, अकोले 81, जामखेड 73, कर्जत 222, कोपरगाव 62, नगर ग्रामीण 144, नेवासा 81, पारनेर 85, पाथर्डी 133, राहाता 124, राहुरी 128, संगमनेर 110, शेवगाव 104, श्रीगोंदा 79, श्रीरामपूर 127, कॅन्टोन्मेंट 18, मिलिटरी हॉस्पिटल 01,इतर जिल्हा 20 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.