बनावट रेमडेसिविर विकणारा गजाआड

नगर (प्रतिनिधी) – रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यात सलाईनमधील पाणी भरून रेमडेसिविर म्हणून विक्री करणार्‍या एकाला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले. रईस अब्दुल शेख (वय 20, रा. मातापूर ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे.

रोनामुळे रेमडेसिविर औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णाचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी हॉस्पिटलमध्ये भटकत आहेत. असे असताना एका रुग्णाच्या नातेवाइकाला रईस शेख याचा फोन आला आणि रेमडेसिविर देतो, असे त्याने सांगितले. 

त्या रुग्णाच्या नातेवाइकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आज सायंकाळी श्रीरामपूर येथील ओव्हर ब्रीजजवळ रइस शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट रेमडेसिविर हस्तगत केली. पोलिसांनी विचारपूस केली असता तो म्हणाला, डॉक्टरांनी कचर्‍यात फेकून दिलेल्या रिकाम्या बाटल्यामध्ये सलाईनचे पाणी भरून व्रिकी करीत होतो. 

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरवडे, पोललीस कर्मचारी दुधाडे, किरण पवार, वांढेकर, अर्जुन पोकळे यांनी केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.