मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा फोटोमुळे नेहमीच सोशल वर चर्चेत असतात. अनेकदा त्यांचा फोटोमुळे नेटकऱ्यामध्ये सोशलवर वाद होताना दिसतो. यातच पुन्हा एकदा त्यांचा फोटोवरून सोशलवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यातील मैत्रीवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात असतात. सोशलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या फोटोमध्ये पंतप्रधानांनी चक्क नीता अंबानींसमोर हात जोडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो सध्या नेटकऱ्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या फोटो मागील सत्य हिंदी वृत्त वाहिनीने सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोटोतील स्त्री दीपिका मॉन्डल आहे. त्यांचा फोटोला सोशलवर एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोत खऱ्या फोटोमध्ये नीता अंबानींऐवजी दीपिका मॉन्डल आहेत. राष्ट्रपती भवनातील एका निवृत्त छायाचित्रकाराच्या त्या पत्नी असून मोदी त्यांना अभिवादन करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये नीता अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसून येत आहेत.पंतप्रधान मोदी चक्क चार लोकांमध्ये नीता अंबानी यांच्यापुढे हात जोडून नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला आहे. यामध्येच एका नेटकऱ्याने पंतप्रधान मोदींना चांगलंच ट्रोल केलं आहे.